राहुल गांधीची आज चौथ्यांदा होणार ईडी चौकशी, काँग्रेस आजही आंदोलन करण्याच्या तयारीत

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आज चौथ्यांदा ईडीसमोर चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. काँग्रेसकडून आजही केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी होणार आहे. राहुल गांधी यांची ही सलग चौथी चौकशी आहे. काँग्रेसकडून आजही या कारवाई विरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे.


    राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. त्यांना पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती आहे. या दरम्यान राहुल गांधी यांच्या चौकशीचे व्हिडिओ रेकोर्डिंग करण्यात आले. त्याशिवाय, त्यांनी दिलेल्या जबावावर ईडी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी घेतली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडी आणखी काही बड्या लोकांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंग इंडियन प्रकरणात ईडीने राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.