sonia and rahul gandhi

दिल्ली : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर १८ महिन्यातही काँग्रेसला कोणताही अध्यक्ष गवसला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच असतील असे विधान पक्षाचे नेते अनेकवेळा करत आहेत. आता काँग्रेसच्या २ नेत्यांनी वायनाडचे खासदार राहुल अद्याप काँग्रेस अध्यक्ष होण्यास अद्यापही तयार नाहीत असा दावा केला आहे.

दिल्ली : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर १८ महिन्यातही काँग्रेसला कोणताही अध्यक्ष गवसला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच असतील असे विधान पक्षाचे नेते अनेकवेळा करत आहेत. आता काँग्रेसच्या २ नेत्यांनी वायनाडचे खासदार राहुल अद्याप काँग्रेस अध्यक्ष होण्यास अद्यापही तयार नाहीत असा दावा केला आहे. तथापि, अन्य एका नेत्याने मात्र आता राहुल अध्यक्ष म्हणून परतणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले असल्याचे शिक्कामोर्तबच करून टाकले आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून संशयकल्लोळ असला तरी राहुल गांधींनी जर पक्षाध्यक्षपद नाकारले तर मात्र काँग्रेस नेतृत्वाने प्लान बी देखील तयार केला असल्याचे समजते.

विदेश दौऱ्याचे गमक
काँग्रेसच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त राहुल गांधी परदेश दौऱ्यावर निघाले. त्यांचा हा दौरा अशा वेळी आहे जेव्हा हजारो शेतक्यांनी दिल्लीच्या सीमेवरील कृषी कायद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी ऐन मोक्याच्या क्षणी विदेश दौरा आखून अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचेच सांगण्याचा संदेश दिला असल्याचे समजते.

मनधरणीचे प्रयत्न अपयशी!
या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एका काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना हरतऱ्हेने पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक नेत्याने सोनिया गांधींसोबत या मुद्यावर वैयक्तिक चर्चा करून राहुल गांधींची मनधरणीही केली आहे. परंतु नेत्यांच्या सादेला राहुल गांधी प्रतिसादच देण्यास तयार नाहीत असे हा नेता म्हणाला.

मी तर सामान्य कार्यकर्ता…
काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या गटासोबत झालेल्या बैठकीतही राहुल गांधी यांना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत गळ घातली. त्यावेळी राहुल गांधी यांनी मौन साधले होते परंतु थोड्या वेळाने मौन सोडत त्यांनी मी सुद्धा सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्याचप्रमाणे काम करेन असे स्पष्ट केले. त्यामुळेच गांधी कुटुंबाशी जवळीक असलेल्या नेत्यांना राहुल गांधी अध्यक्षपदाबाबत आपला निर्णय बदलणार नसल्याचे वाटत आहे. परंतु काँग्रेस कोर कमिटीला मात्र राहुल गांधींची मनधरणी यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

…तर काँग्रेसचा प्लान बी
– राहुल गांधी यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने प्लान बी सुद्धा तयार केला असल्याची माहिती सूत्राने दिली. ऑगस्ट महिन्यात काँग्रेस नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने आता सामूहिक नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव दिला होता. प्लान बी नुसार, पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात ४ उपाध्यक्ष (प्रत्येक क्षेत्रासाठी एक) नियुक्त करू शकतात.
वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुार, या चारही उपाध्यक्षक्षांची उपस्थिती नाममात्र राहील.

– एक व्यक्ती म्हणून त्यांचा कोणीही विरोध करणार नाही परंतु चारही उपाध्यक्ष मात्र एकमतानेच निर्णय घेतील. या कामात त्यांना पक्षाचे तीन-चार सरचिटणीसही मदत करतील.