संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कोडरमा येथील जयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परसाबाद रेल्वे फाटकजवळ रेल्वेची ओएचई वायर तुटून पडल्यामुळे रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक कामगार जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

    रांची : कोडरमा येथील जयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परसाबाद रेल्वे फाटकजवळ रेल्वेची ओएचई वायर तुटून पडल्यामुळे रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक कामगार जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

    पुरी-दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेस 135 किमी वेगाने जात असताना कोडरमा धनबाद रेल्वे स्थानकानजीक परसाबाद-रेल्वे स्थानकावर ही तार तुटून पडली व ट्रेनमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला. खडखडाटाचा आवाज आल्याने प्रवासी घाबरले व कुणीतरी साखळी ओढल्यानंतर ही ट्रेन थोड्या अंतरावर पुढे जाऊन थांबल्याने पुढील अनर्थ टळला.

    बोगी फाडून घुसला रॉड

    या ट्रेनच्या जनरल बोगीत बाहेरून आलेला रॉड बोगीत फाडून आंध्र प्रदेशातील मजूर संजय मांझीच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.