३१ मार्चपर्यंतच्या रेल्वे रद्द? थांबा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी रेल्वेचा हा खुलासा वाचा

रेल्वे रद्द झाल्याची बातमी खोटी असून प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. ३१ मार्चपर्यंतच्या रेल्वे रद्द झाल्याचं वृत्त निराधार असून ते नागरिकांची दिशाभूल करणारं असल्याचं रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून यंदा असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. 

    महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेक भागात अंशतः लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्याचा मेसेज सध्या व्हायरल होतो आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

    रेल्वे रद्द झाल्याची बातमी खोटी असून प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. ३१ मार्चपर्यंतच्या रेल्वे रद्द झाल्याचं वृत्त निराधार असून ते नागरिकांची दिशाभूल करणारं असल्याचं रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून यंदा असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय.

    गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील बातम्यांच्या काही क्लिप्स सोशल मीडियातून सध्या व्हायरल होत आहेत. या बातम्यांमध्ये केवळ तारखेला उल्लेख असून वर्षाचा उल्लेख नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची दिशाभूल होत असून याच वर्षीच्या मार्चमधील रेल्वे रद्द झाल्या की काय, असा प्रश्न बुकिंग केलेल्या नागरिकांना पडलेला आहे. मात्र गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. यंदा असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचं रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून जाणीवपूर्वक जुन्या आणि खोट्या बातम्या व्हायरल केल्या जात असल्याचं चित्र दिसतंय. अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर सायबर सेल बारीक नजर ठेऊन असल्याचं सांगितलं जातंय.