रेल्वेने माल वाहतूकीत कमावले पण प्रवासी वाहतूकीमुळे झाला तोटा, आर्थिक गणित कोलमडले

कोविड-१९ मुळे आर्थिक वर्षात(economic year) प्रवासी भाड्यात रेल्वेला(railway in loss) ३८१०७ कोटींचा महसुली तोटा झाला असला तरी सद्भावनेंतर्गत श्रमिक विशेष रेल्वेगाड्या(special trains) चालविण्यात आल्यामुळे तोट्याची काही प्रमाणात भरपाई झाली आहे.

    दिल्ली: कोविड-१९ मुळे  आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यात रेल्वेला(railway) ३८१०७ कोटींचा महसुली तोटा झाला असला तरी सद्भावनेंतर्गत श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्यामुळे तोट्याची काही प्रमाणात भरपाई झाली आहे. दुसरीकडे मालवाहतुकीमुळे मात्र रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आहे.

    रेल्वेने नियमित प्रवासी गाड्यांचे संचालन अद्यापही सुरू केलेले नाही परंतु मालवाहतुकीद्वारे महसूल प्राप्तीचे ध्येय मात्र कायम ठेवले आहे. मालवाहतुकीद्वारे होणाऱ्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ झाली असली तरी कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या संकटातून बाहेर पडण्यास रेल्वेला मदतही मिळाली आहे. गेल्या वर्षी रेल्वेला मालवाहतुकीद्वारे १८६८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

    ७१.०३ टक्के तूट

    प्रवासी गाड्यांद्वारे रेल्वेला गेल्या वर्षी (२०१९-२०) ५३५२५.२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता जो विद्यमान आर्थिक वर्षात (२०२०-२१) मध्ये १५५०७.६८ कोटी झाला. ही प्राप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ७१.०३ टक्के कमी आहे. आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रवासी भाड्याद्वारे रेल्वेला १२४०९.४९ कोटींचा महसूल प्राप्त झाला जो याच समान कालावधीत गेल्या वर्षी ४८८०९.४० कोटी रुपये होता. प्रवासी संख्या कमी असतानाही रेल्वेने स्थलांतरितांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी ४००० विशेष ट्रेन संचालित केल्या व २३ राज्यातून जवळपास ६३.१५ लाख मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले.