Rajasthan Cop Dragged On Bonnet By Traffic Violator

सूर्यनगरी जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करून घेणे एका पोलिस कर्मचाऱ्यालाच महागात पडले. एका ड्रायव्हरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलिस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत कार चालवत राहिला(Rajasthan Cop Dragged On Bonnet By Traffic Violator). 

    जोधपूर : सूर्यनगरी जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करून घेणे एका पोलिस कर्मचाऱ्यालाच महागात पडले. एका ड्रायव्हरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलिस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत कार चालवत राहिला(Rajasthan Cop Dragged On Bonnet By Traffic Violator).

    रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांनी आपली दुचाकी समोर लावून कार थांबवली आणि पोलिस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रकरण जोधपूरच्या देवनगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रविवारी पाल लिंक रोडवर असलेल्या शाळेसमोर वाहतूक पोलिस हवालदार गोपाल विश्नोई ड्युटीवर होते. इतक्यात समोरून एक कार आली. कार चालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. यावर हवालदार गोपाल विश्नोई यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला.

    कारचा चालक गजेंद्र सालेचा या तरुणाने आधी कार थांबवली आणि पोलिस शिपाई गोपाल विश्नोई यांच्याशी वाद घातला. नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात गाडीच्या समोर उभा गोपाल विश्नोई यांना धडक लागली आणि ते कारच्या बोनेटवर पडले. हे सर्व पाहूनही त्या तरुणाने लक्ष दिले नाही आणि कार चालवतच राहिला. हे पाहून पोलिसाने कारचा वायपर पकडत बोनेटवर टिकून राहाण्याचा प्रयत्न केला. तरीही चालक पर्वा न करता कार पुढे चालवत राहिला.

    यादरम्यान, तिथून जाणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांची दुचाकी कारसमोर लावून कार अडवली. त्यानंतर चालकाने कार थांबवली. मग गोपाल विश्नोई हे बोनेटवरून खाली उतरले आणि त्यांच्या जीवात जीव आला. घटनेनंतर देवनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी जयकिशन यांनी घटनास्थळ गाठून कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.