
पोलिसांनी जेलमध्ये उदयपूर हत्याकांडातील (Udaipur Murder Case) दोन्ही आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) ट्विटरच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
उदयपूरमध्ये (Udaipur Horror) शिवणकाम करणाऱ्या व्यावसायकाची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे (Udaipur Murder Case) संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी जेलमध्ये उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) ट्विटरच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. हा दावा खोटा असल्याचं राजस्थान पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
#सोशल_मीडिया पर वायरल हो रही है एक फेक न्यूज। ये सरासर गलत है। #उदयपुर में जघन्य अपराधियों के खिलाफ #राजस्थान_पुलिस कठोर कार्रवाई करेगी।
पुलिस असामाजिक तत्वों से नरमी से नहीं आएगी पेश।
प्रदेश में कानून व्यवस्था कायम रखने के लिए #राजस्थान_पुलिस है कटिबद्ध। pic.twitter.com/arcWua5oX3
— Rajasthan Police (@PoliceRajasthan) June 29, 2022
एका वेबसाईटने “अटक केल्यानंतर उदयपूरमधील हल्लेखोरांना राजस्थानधील जेलमध्ये बिर्याणी देण्यात आली. जर हे उत्तर प्रदेश असतं तर?” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. यानंतर अनेकांनी ही बातमी ट्विटरला शेअर केली होती. एका वृत्तवाहिनीच्या संपादकानेही हे ट्विट केलं होतं.
राजस्थान पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल होत आहे. हे चुकीचं आहे. उदयपूरमध्ये हत्या करणाऱ्या अपराध्यांच्या विरोधान राजस्थान पोलीस कठोर कारवाई करतील. पोलीस त्यांच्यासोबत नरमाईने वागणार नाही. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी राजस्थान पोलीस कटीबद्ध आहेत.” या ट्विटमध्ये त्यांनी बातमीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले. तसेच या हल्ल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.