rajnath singh

बिपीन रावत यांच्या निधनानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh Reaction After Bipin Rawat Death) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Death) , त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्या निधनानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh Reaction After Bipin Rawat Death) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सीडीएस बिपीन रावत त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे मला खूप वेदना होत आहेत. त्यांचा अचानक झालेला मृत्यू हे भारताच्या संरक्षण दलाचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे.”

    दुसऱ्या एका ट्विटमध्ये राजनाथ सिंह म्हणतात की,  “जनरल रावत यांनी खूप धैर्य आणि परिश्रम घेऊन देशाची सेवा केली. भारताचे पहिले सीडीएस म्हणून त्यांनी संरक्षण दलासाठी अनेक चांगल्या योजना तयार केल्या.”

    राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.तसेच कॅप्टन वरूण सिंग बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. वेलिंग्टनमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.