ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी भारतीय जेरबंद

राजविंदरने टोयाह कॉर्डिंग्ले नामक महिलेची हत्या केली होती. हत्येच्या २ दिवसांनंतर तो पत्नी-मुलांसह नोकरी सोडून पळून गेला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१८ ध्ये २४ वर्षीय टोयाह कॉर्डिंग्ले ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर आपल्या श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा तिची हत्या करण्यात आली होती.

    नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी एका ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या केल्याप्रकरणी राजविंदर सिंग नामक एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. राजविंदरने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये एका महिलेची हत्या केली होती. त्यानंतर तो भारतात पळून आला होता. तो इनिसफेलमध्ये नर्स म्हणून काम करत होता.

    राजविंदरने टोयाह कॉर्डिंग्ले नामक महिलेची हत्या केली होती. हत्येच्या २ दिवसांनंतर तो पत्नी-मुलांसह नोकरी सोडून पळून गेला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१८ ध्ये २४ वर्षीय टोयाह कॉर्डिंग्ले ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर आपल्या श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा तिची हत्या करण्यात आली होती.

    क्वींसलँड पोलिसांनी गत महिन्यात राजविंदरची माहिती देणाऱ्याला ०१ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. हे क्वींसलँड पोलिसांनी आतापर्यंत ठेवलेले सर्वात मोठे बक्षीस होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, टोयाहची हत्या केल्यानंतर राजविंदर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतात पळून गेल्याचे आम्हाला ठावूक होते. २३ ऑक्टोबर रोजी त्याने सिडनीहून भारताच्या दिशेने उड्डाण केले होते.

    ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०२१ मध्ये भारताकडे राजविंदर सिंग याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला यंदा नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यसााठी गत महिन्यात पंजाबी व हिंदी अवगत असणारे ऑस्ट्रेलियन पोलिस भारतात आले होते.