फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येत होणार रामललाची प्रतिष्ठापना, राम जन्मभूमी न्यासाच्या कोषाध्यक्षांचा खुलासा

फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये (Ayodhya) रामललाची प्रतिष्ठापना (Ram Mandir) होणार आहे. त्यानंतर भाविकांना राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासचे (Ram Janmbhoomi Nyas) कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज (Govinddev Giriji Maharaj) यांनी दिली आहे.

    अयोध्या: राममंदिराचं (Ram Mandir) काम अयोध्येमध्ये (Ayodhya) वेगानं सुरु आहे. राममंदिरात रामललाची प्रतिष्ठापना कधी होणार आणि राममंदिरात भाविकांना कधी जाता येणार याची सगळे जण वाट बघत होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर भाविकांना राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासचे (Ram Janmbhoomi Nyas) कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज (Govinddev Giriji Maharaj) यांनी दिली आहे.

    त्यांनी सांगितलं की, फेब्रुवारी २०२४ मध्ये रामललाची नूतन गर्भगृहात स्थापना करणार आहोत. त्यावेळी पहिला मजला, गर्भगृह होईल, लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिरचे बांधकाम चालू राहील, असंही ते म्हणाले.

    गोविंददेव गिरीजी महाराज यांनी म्हटलं की, ज्ञानवापीमध्ये जो तपास चालू आहे तो नवीन नाही, याप्रकारचे ऐतिहासिक पुरावे पुष्कळ शतकाच्या आधीच मिळाले होते. पुरातन काळातील नंदी आहे. त्याचे तोंड मशिदीकडे त्यामुळे तिथे शिवलिंग मिळणे, इतरही काही मूर्ती मिळणे हे स्वाभाविक आहे. तीन मंदिरं आम्हाला देऊन टाका चौथ्या कुठल्याही मंदिराचा वाद होणार नाही, ही भूमिका अशोक सिंघल यांनी मांडली होती. कुणी भडकविण्याची भाषा करू नये, सर्वांना सोबत घ्यावे, असंही ते म्हणाले.

    त्यांनी म्हटलं की, मुस्लिम समाजातील तरुण, परिपक्व वर्गाला विवाद वाढवू नये, सहमतीने सर्व करावे असे वाटत आहे. मुस्लिम समाज स्वतःहून पुढे येईल. सलोख्याच्या वातावरणात प्रश्न मिटेल. मुस्लिम पक्षकार त्यांचे दावे करतीलच पण वस्तुस्थिती काय आहे हे बघितले पाहिजे, असंही ते म्हणाले.

    त्यांनी म्हटलं की, मी विद्यार्थी दशेत तेजोमहालाय हे पुस्तक वाचले होते, आम्हा सर्वांना विश्वास आहे. ताजमहालच्या ठिकाणी राजपुतांनी बांधलेले शिवमंदिर होते, त्याचे तेजोमहालय नाव होते. केवळ शाहजहानने बांधलेली इमारत नव्हती, तर काहीतरी हिंदूंची मूळ वास्तू होती अशी शक्यता आहे. ज्या खोल्या बंद केल्यात त्या उघड्या करून त्याचे रेकॉर्डिंग करून घ्यावे म्हणजे प्रश्न मिटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.