कॅालेजच्या फॅशन शोमध्ये बुरखा घालून विद्यार्थिनींचा रॅम्प वॉक, व्हिडिओ व्हायरल होताच गोंधळ, जमियत उलेमाने घेतला आक्षेप!

मुझफ्फरनगरमधील एका कॉलेज फॅशन शोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बुरखा परिधान केलेल्या काही विद्यार्थिनी रॅम्पवर चालताना दिसल्या. मात्र जमियत उलेमाने त्याला विरोध केला. एका धर्माला टार्गेट करण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले.

  साधरणत: फॅशन शो म्हण्टलं की डोळ्यासमोर येतात तोकड्या कपड्यातील मॅाडेल्स. पण आता फॅशन शो इंथपर्यंत मर्यादीत राहिला नसून सगळ्या प्रकारच्या कपडे घालून रॅम्प वॉक करताना मॅाडेल्स दिसतात. मात्र, सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झाले्सया एका फॅशन शोची खूप चर्चा आहे. येथील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये फॅशन शोचे (collage fashoon show) आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मुलींनी बुरखा घालून रॅम्प वॉक (Rampwalk in Burqa) केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी समर्थन केलं तर जमियत उलेमाने याला कडाडून विरोध करण्यात आला . जमियतचे मौलाना मुकर्रम कासमी यांनी हे पूर्णपणे चुकीचे आणि मुस्लिमांच्या भावना भडकवणारे असल्याचे म्हटले आहे. बुरखा हा कोणत्याही फॅशन शोचा भाग नाही, असे त्यांनी म्हण्टलं आहे.

  जमियत उलेमानं केला विरोध

  जमियतचे मौलानाकडून या फॅशन शोला विरोध केला आहे.  हे एका धर्माला लक्ष्य करत असल्याचंही मौलाना म्हणाले. असे करून मुस्लिम समाज आणि त्यांच्या धार्मिक भावना काही प्रमाणात भडकावण्यात आल्या आहेत. यावर कारवाई करावी. तर रॅम्प वॉक करणाऱ्या मुस्लीम मुलींनी ही एक सर्जनशीलता आणि वेगळा उपक्रम असल्याचे सांगितले. यात काही गैर नाही. असं विद्यार्थिनींनी म्हण्टलं आहे.

  विद्यार्थिंनीनीचं काय म्हणणं

  बुरखा घालून रॅम्पवर कॅटवॉक करणाऱ्या मुलीने सांगितले की, आम्हाला फॅशन शोमध्ये काहीतरी क्रिएटीव्ह करायचं होतं. त्यामुळे आम्ही मुस्लिम समाजातील मुलींसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि आम्ही बुरखा घालून रॅम्पवॉक करण्याचा विचार केला. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. बुरखा आपण ते फक्त घरीच घालाव असं नाही, फॅशन शोमध्येही बुरखा आणला पाहिजे, असे आमचे मत आहे.

  दुसरीकडे रॅम्प वॉक करणारे शिक्षक मनोज म्हणाले की, मुस्लिम कुटुंबांमध्ये कुठेतरी महिलांनी पुढे येऊ नये, अशी भावना आहे. तर, हिजाब हा त्यांच्यासाठी मोठा त्याग आहे. हा त्यांचा पडदा आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते फक्त घरीच परिधान केले पाहिजे. महिलाही बुरखा घालून बाहेर फिरतात. मग बुरखा घालून रॅम्प चालण्यात गैर कुठे आहे? परदेशात, हिजाबचे विशेषज्ञ डिझाइनर आहेत. स्त्रिया त्याच्या जाहिरातींसाठी फोटोशूटही करून घेतात. या रॅम्पवॉकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपट अभिनेत्री मंदाकिनी देखील आली होती.