राहुल गांधींच्या अडचणींत होणार वाढ?; आता सावरकरांच्या नातूने दिलाय ‘हा’ इशारा

राहुल गांधी यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण सावरकर यांच्या नातूने राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी नुकतीच रद्द करण्यात आली. लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काँग्रेससह विरोधकांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण सावरकर यांच्या नातूने राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

राहुल गांधींनी 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांबाबत विधान केले होते. सरकार त्यांना घाबरवू शकत नाही. मी सावरकर नाही. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत, अशाप्रकारे त्यांनी विधान केले होते. त्यानंतर आता हिंदुत्ववादी विचारवंत वीर दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावरकर म्हणाले, ‘सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे राहुल गांधींनी द्यावेत. राहुल गांधी सावरकर नसल्यामुळे माफी मागणार नाही असे सांगत आहेत. मी त्यांना आव्हान देतो की सावरकरांच्या माफीचा कोणताही पुरावा दाखवा’.

सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका

वि. दा. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले, ‘राहुल गांधी राजकारणासाठी सावरकरांचे नाव कसे बदनाम करत आहेत हे पाहून खरोखरच वाईट वाटते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावावर राजकारण केले जात आहे. सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तसेच सावरकर यांच्या नातूने राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.