​​​​​​​बिहारमधील संतापजनक घटना, ५ वर्षीय मुलीवर रेप करणाऱ्याला ५ उठाबशांची शिक्षा

नवादा जिल्ह्यातील अकबरपूर तालुक्यातील कनौज गावात ही घटना घडली आहे. त्यात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कथित पंचांनी अवघ्या काही उठाबशांची शिक्षा देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. अरुण पंडित असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे.

    नवी दिल्ली – एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अवघ्या ५ उठाबशांची शिक्षा देण्यात आल्याची संतापजनक घटना बिहारच्या नवादात घडली आहे. या शिक्षेनंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. पण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.

    नवादा जिल्ह्यातील अकबरपूर तालुक्यातील कनौज गावात ही घटना घडली आहे. त्यात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कथित पंचांनी अवघ्या काही उठाबशांची शिक्षा देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले. अरुण पंडित असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. आरोपीने या कुक्कुटपालनाच्या शेडमध्येच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण ज्या प्रकारे प्रकरण दाबून टाकण्यात आले त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे.

    पंचायतीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शाल घेतलेला व्यक्ती उठाबशा काढताना दिसून येत आहे. त्याच्या बाजूला नागरिक बसल्याचेही दिसून येत आहे. ५ उठाबशांची शिक्षा दिल्यानंतर त्याची शिक्षा पूर्ण झाली. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे.