बलात्कार करणाऱ्याने पीडितेचे घर जाळले, मुलांना आगीत फेकले अन्…

देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने (Crime Rate Increases in India) वाढ होत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना घडली. सामूहिक बलात्कार (Gang Rape in UP) झालेल्या पीडितेचे घरच टाळून टाकण्यात आले.

  उन्नाव : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने (Crime Rate Increases in India) वाढ होत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना घडली. सामूहिक बलात्कार (Gang Rape in UP) झालेल्या पीडितेचे घरच टाळून टाकण्यात आले. पण हे होत असताना ग्रामस्थ शांतपणे पाहत राहिले होते. पण या आगीत खाटेवर झोपलेल्या दोन लहान बालकांचा मृत्यू झाला.

  उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या या जमावाने उलट 14 वर्षीय पीडिता आणि तिच्या आईलाच लाठी-काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि या पीडितेला सामूहिक बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव दिला गेला. आधीच घराला आग आणि त्यात जमावाचा दबाव त्यामुळे पीडितेची आई जमावाला थांबण्याची विनंती करत होती. पीडित मुलगी मदतीसाठी ओरडत गावात आली. पण तिला कोणीही मदत केली नाही. काहींनी मदत न करता थेट दार बंद करून तिला मदतीसाठी थेट नकारच दिला.

  मी दयेची विनंती केली पण…

  ‘मी दयेची विनंती केली. मात्र, त्यांनी मला सोडले नाही आणि माझ्या नवजात बाळाला आणि बहिणीच्या बाळाला आगीत फेकून दिले’, असे या पीडितेने म्हटले आहे. तसेच या पीडितेने लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये तिचा तुटलेला आणि पांढरा प्लास्टरने झाकलेला हातही दाखवला.

  उत्तर प्रदेश हादरलं

  या सामूहिक बलात्काराची घटना आणि त्यानंतर बलात्कार करणाऱ्या नराधमांनी अशाप्रकारे पीडितेच्या घरावरच हल्ला चढवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अशा घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरलं असून, उन्नावच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.