ख्रिश्चन धर्मियांना आकर्षित करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनिती? नाताळ सणाच्या धरतीवर प्रथमच ख्रिसमस डिनरचे आयोजन करणार

नाताळ सणाचे औचित्य डोळ्यासमोर ठेवून आता देशातील ख्रिश्चन समाजाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक वेगळी रणनिती अवलंबली आहे. आता प्रथमच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला शुक्रवारी मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनरचे आयोजन करणार आहेत.

    मेघालय – ख्रिश्चन बांधवांचा दिवाळी-दसरा म्हणजे नाताळ सण, हा नाताळ सण काही तासांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळं देश-विदेशात हा सण मोठ्या उत्साहात आणि जोरदार साजरा केला जातो. दरम्यान, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी ऑफर पाहयला मिळते. दरम्यान, नाताळ सणाचे औचित्य डोळ्यासमोर ठेवून आता देशातील ख्रिश्चन समाजाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक वेगळी रणनिती अवलंबली आहे. आता प्रथमच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला शुक्रवारी मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनरचे आयोजन करणार आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, संघाची कट्टर हिंदू अशी ओळख आहे, तरीपण आता अन्य धर्मियांचे सण आरएसएस कसे काय साजरे करताहेत? अशी चर्चा सुरु आहे.

    दरम्यान, संघाशी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंतचे चर्च प्रमुख सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्यांदा विजयानंतर संघ किंवा भाजपशी अंतर ठेवणे योग्य नाही, असे ख्रिश्चन समुदायाचेही मत आहे. मतपेढीच्या राजकारणाचा भाग बनू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने चर्च प्रमुखांना सांगितले आहे. त्यामुळं आता ख्रिश्चन बांधवांचा आपलंस करण्यासाठी भाजपाने व संघान ही रणनिती असल्याच काँग्रेसनं म्हटलं आहे.