लोकसंख्या नियंत्रण कायदा असता तर मला चार मुलं नसती, रवी किशन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला असता चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

    पटना:  देशात गेल्या काही दिवसापासून लोकसंख्या नियंत्रण विधेयकाबाबत चर्चा सुरू आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे समाजात चिंता व्यक्त होत असताना भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत विचित्र वक्तव्य केलं आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी त्यांनी काँग्रेसला (Congress) जबाबदार धरले आहे. काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक (Population Control Bill ) आणले असते तर आज चार मुलांचा बाप झाला नसतो, असे त्यांनी म्हण्टलंय.

    काँग्रेसवरील आरोप काय

    गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन म्हणाले की, ते चार मुलांचे वडील आहेत आणि वाढत्या लोकसंख्येची समस्येबाबत त्यांचा माहिती आहे. मला चार मुले आहेत, ही चूक नाही, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. काँग्रेस सरकारने त्यावेळी विधेयक आणले असते आणि कायदा असता तर मला चार अपत्ये झाली नसती. आधीच्या सरकारने या बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी होती, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला असता तर त्यांना चार अपत्ये झाली नसती, असे ते म्हणाले. काँग्रेस सरकारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे.

    चार मुले झाल्याचा पश्चाताप

    रवी किशन पुढे म्हणाले की, या संदर्भात ते संसदेत प्रस्ताव मांडणार आहेत. याशिवाय आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला असता चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. ते पुढे म्हणाले की, चीनने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले आहे. आपल्या देशातील आधीच्या सरकारांनी विचार केला असता तर येणाऱ्या पिढ्यांना असा संघर्ष करावा लागला नसता.