‘हिंदूंव्यतिरिक्त इतर समुदायांपर्यंत पोहोचा’, पंतप्रधानांचे पक्षाला आवाहन

हैदराबादमध्ये सुरू असलेली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षाला मार्गदर्शन केलं. उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.

    नवी दिल्ली – “इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केलं आहे. याबाबतची माहिती पक्षातील एका व्यक्तीने दिली आहे.

    हैदराबादमध्ये सुरू असलेली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षाला मार्गदर्शन केलं. उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी “सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिमांसारख्या समुदायांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन पक्षाला केलं आहे.