नक्षली संघटनेत देशभरातील तरुणांची भरती

    आसाम(Assam)मध्ये बंदी असलेली नक्षली संघटना (Naxalite Organization) युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (इंडिपेंडंट) (United Liberation Front Of Assam) म्हणजे उल्फा-आय पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविषयी गृह मंत्रालयाचा एक अहवाल समोर आला आहे. उल्फा-आय (Ulfa I) आसामसोबतच दिल्ली-एनसीआर आणि देशातील इतर ठिकाणी तरुणांची भरती करून त्यांना नक्षली प्रशिक्षण देत आहे. काही महिन्यांत संघटनेने १५० तरुणांची भरती (Youth Recruitment)केली आहे.

    उल्फा अपहरणासोबतच सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर गृह मंत्रालया(Ministry Of Home Affairs)ने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास सोपवला आहे. पोलीस आणि काही इतर गुप्तचर संस्थांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोठ्या संख्येने तरुण संघटनेत सामील होत आहेत. ग्रामीण भाग आणि राजधानी गुवाहाटीच्या काही भागात तरुण बेपत्ता होणे, त्यानंतर ते उल्फा-आयमध्ये सामील झाल्याचे वृत्त येत आहे.

    उल्फा-आयने आपला फेसबुक ग्रुपही तयार केला आहे. त्याद्वारे आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने तरुणांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी दुर्गम भागातील गावागावात जात आहेत. अतिशय गरिबी, पायाभूत सुविधांच्या अभावात जगणाऱ्या लोकांना संघटनेशी जोडण्याचे प्रयत्न होऊ शकतात.