
या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्करात 25000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असला तरी केंद्र सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. आजपासून लष्करात अग्निपथ योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नौदलातल्या भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन मंगळवारी, २१ जून ला निघणार असून वायुदलातील भरती प्रक्रिया २४ जूनपासून सुरु होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे. भारतीय हवाई दलातील अग्निवीर भरतीच्या या तुकडीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा 24 जुलैपासून सुरू होणार आहे. तर, प्रशिक्षणासाठीची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू आहे. ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
एका बाजूला अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथील करण्यात आली आहे. मागील दोन वर्षी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
📢 #Agniveer aspirants, get ready!
Notification dates for recruitments under #AgnipathScheme 👇
🇮🇳 Indian Army @adgpi – June 20, 2022.
🇮🇳 Indian Navy @indiannavy – June 21, 2022.
🇮🇳 Indian Air Force @IAF_MCC – June 24, 2022.#AgnipathRecruitmentScheme #Agnipath #Agniveers pic.twitter.com/ZFPxcOZTcX
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) June 20, 2022
नौदलातील संधी
भारतीय नौदलातील अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेसाठी 21 जून रोजी नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे. ओदिशा येथील आयएनएस चिल्कामध्ये प्रशिक्षणासाठी 21 नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नौदलात महिला आणि पुरुष दोन्ही अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. नौदलात या आधीपासूनच विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी दाखल आहेत.
पहिल्या फेजमध्ये २५००० अग्नीवीर होणार दाखल
या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्करात 25000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 पर्यंत दुसऱ्या तुकडीत या प्रशिक्षणार्थींची भरती पूर्ण करून ही संख्या 40000 करण्यात येणार आहे. आगामी 4 ते 5 वर्षात अग्निवीरांची संख्या 50 ते 60 हजार करण्यात येणार आहे. त्यानंतर 90 हजारांहून वाढवून एक लाख इतकी करण्यात येणार आहे.