नाव-चिन्हाबाबत याचिकेवर हस्तक्षेपास नकार; उद्धव ठाकरे यांना मोठा झटका

शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर हस्तक्षेपास हायकोर्टाने नकार दिला आहे.

    दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर हस्तक्षेपास हायकोर्टाने नकार दिला आहे.

     

    निवडणूक आयोगाच्या या अंतरिम आदेशाविरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचिका फेटाळण्याच्या एकल न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल केली होती.

    दरम्यान त्यावर सुनावणी करत मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठाने म्हटले की, “भारताचा निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ च्या परिच्छेत १५ अंतर्गत एका याचिकेवर निर्णय घेतेवेळी आयोगाने अवलंबलेल्या प्रक्रियेनुसारच पुढे जाईल, हे सांगण्याची गरज नाही.