reliance jio 2599 rupees highest data pack offering 740gb data yearly and 12000 minutes

रिलायन्स जिओ(jio) या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य(free calling from jio) केली आहे.

रिलायन्स जिओ(jio) या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने १ जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य(free calling from jio) केली आहे.

जिओने आययुसी म्हणजेच interconnect usage charges  बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही शुल्काशिवाय कॉलिंग करता येणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अर्थात ट्रायच्या निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून नवा नियम लागू होणार आहे. त्यामुळे आययुसी चार्ज संपणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये आययुसी चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय आययुसी चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून आययुसी चार्ज आकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

आता ट्रायने १ जानेवारीपासून आययुसी चार्ज न आकारण्याचं जाहीर केलंय, त्यानुसार जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा मिळेल असं स्पष्ट केलं. सध्या जिओकडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययुसी चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला १४ पैसे आकारत होती, नंतर ७ पैसे आकारले जात होते. पण आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग १ जानेवारीपासून करता येणार आहे.