पुरातन मुर्त्या, खांब, दगड… अयोध्येतील रामजन्मभूमीवर ५० फूट खोदकामात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष!

जेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू झालं केव्हा जवळपास 40 ते 50 फूट खोदकाम करण्यात आलं होतं. मंदिर परिसरातील खोदकामादरम्यान या सगळ्या वस्तू मिळाल्या होत्या.

  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या अयोध्येतील राम मंदीराचं (Ayodhya Ram Mandir) बांधकाम प्रगतिपथावर आहे. येत्या जानेवारी 2024 मध्ये हे मंदीर भक्तासांठी खुलं होणार आहे. या संदर्भात सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मंदिरासाठी खोदकाम करताना प्राचीन मंदीराचे काही अवशेष मिळाले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट चे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून ही माहिती दिली.

  खोदकामा दरम्यान काय काय मिळालं?

  राम मंदिर बांधण्यासाठी खोदकामादरम्यान मिळालेल्या वस्तूंचा फोटो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मूर्ती, खांब, दगडांचा समावेश आहे. या दगडांमध्ये देवी- देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आली आहे. खोदकामादरम्यान मिळालेल्या या अवशेषांना रामलल्लाच्या भव्य मंदिरात भक्तांसाठी दर्शनाकरिता ठेवण्यात येईल.

  जेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू झालं केव्हा जवळपास 40 ते 50 फूटखोदकाम करण्यात आलं होतं. मंदिर परिसरातील खोदकामादरम्यान या सगळ्या वस्तू मिळाल्या होत्या.

  मंदिराच्या तळमजल्याचे 80 टक्के काम पूर्ण

  सध्या राम मंदिराच्या तळमजल्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात एकूण 162 खांब करण्यात आले आहेत. आता या खांबांमध्ये 4500 हून अधिक मूर्ती कोरल्या जात आहेत. यात त्रेतायुगाची झलक पाहायला मिळणार आहे. यासाठी केरळ-राजस्थानमधून 40 कारागिरांना पाचारण करण्यात आले आहे.

  वास्तुविशारद अभियंता अंकुर जैन यांनी सांगितले की,  – प्रत्येक खांब 3 भागात विभागलेला आहे. प्रत्येक खांबावर 20 ते 24 मूर्ती कोरल्या जात आहेत. वरच्या भागात 8 ते 12 मूर्ती बनवल्या जात आहेत. मधल्या भागात 4 ते 8 तर खालच्या भागात 4 ते 6 मूर्ती कोरल्या जात आहेत. एका कारागिराला एका स्तंभावर मूर्ती कोरण्यासाठी सुमारे 200 दिवस लागतात.