पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या…

आज पेट्रोलच्या किंमती 26 वरून 29 पैशांनी वाढल्या आहेत तर डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. मुंबईत आज पेट्रोल 103.36 रुपये तर डिझेल 95.44 रुपये प्रति लिटर पोहोचलं आहे. शनिवारी देशभरातील तेलाचे दर स्थिर होते. 1 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 27 वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.83 रुपयांची वाढ झाली. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.24 रुपयांनी वाढ झाली आहे

  नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवलेली असताना आता दर दिवशी हे दर बहुतांश भागांमध्ये शंभरीचा आकडा ओलांडताना दिसत आहेत.

  दरम्यान आज पेट्रोलच्या किंमती 26 वरून 29 पैशांनी वाढल्या आहेत तर डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. मुंबईत आज पेट्रोल 103.36 रुपये तर डिझेल 95.44 रुपये प्रति लिटर पोहोचलं आहे. शनिवारी देशभरातील तेलाचे दर स्थिर होते. 1 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 27 वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.83 रुपयांची वाढ झाली. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.24 रुपयांनी वाढ झाली आहे

  देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती…

  • मुंबई : पेट्रोल 103.36 रुपये तर डिझेल 95.44 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : पेट्रोल 97.12 रुपये तर डिझेल 90.82 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : पेट्रोल आज 98.40 रुपये तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
  • भोपाळ : पेट्रोल आज 105.43 रुपये तर डिझेल 96.65 रुपये प्रति लिटर
  • हैदराबाद : पेट्रोल 101.04 रुपये आणि डिझेल 95.89 रुपये प्रति लिटर
  • बंगळुरु : पेट्रोल 100.47 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  • जयपूर : पेट्रोल 103.88 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.99 रुपये
  • पाटणा : पेट्रोल 99.28 रुपये तर डिझेल 93.30 रुपये प्रति लिटर
  • लखनऊ : पेट्रोल आज 94.42 रुपये तर डिझेल 88.38 रुपये प्रति लिटर
  • गुरुग्राम : पेट्रोल 94.98 रुपये तर डिझेल 88.57 रुपये प्रति लिटर
  • चंदीगड : पेट्रोल आज 93.50 रुपये तर डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर
  • नोएडा : पेट्रोल आज 94.53 रुपये तर डिझेल 88.46 रुपये प्रति लिटर

  पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

  इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

  इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)