संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सुमारे 4 वर्षांपूर्वी 56 किलो सोने लुटणारा मुख्य आरोपी हनी सिंग ऊर्फ युसूफ कैसरची (Honey Singh Murder) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपींनी हनी सिंगला रस्त्याच्या मधोमध 7 गोळ्या झाडल्या.

    पटना : सुमारे 4 वर्षांपूर्वी 56 किलो सोने लुटणारा मुख्य आरोपी हनी सिंग ऊर्फ युसूफ कैसरची (Honey Singh Murder) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपींनी हनी सिंगला रस्त्याच्या मधोमध 7 गोळ्या झाडल्या. बिहारची राजधानी पटनाला लागून असलेल्या हाजीपूरमध्ये ही घटना घडली. या घटनेचे लाईव्ह फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

    हनी सिंगने 2019 मध्ये भारतातील सर्वात मोठी सोन्याची चोरी केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात तो चौहट्टाजवळ रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत आहे. यादरम्यान अचानक मोटारसायकलवरून दोन बदमाश आले आणि त्यांनी हनी सिंगवर गोळीबार केला. यात हनी सिंगचा जागीच मृत्यू झाला.

    सर्वात मोठ्या दरोड्याचा होता सूत्रधार

    हनी सिंग ऊर्फ युसूफ कैंसर हा देशातील सर्वात मोठ्या सोने दरोड्याचा सूत्रधार होता. 2019 मध्ये हाजीपूरमध्ये त्याने मुथूट फायनान्स कंपनीच्या साथीदारांसह सुमारे 56 किलो सोने लुटले होते. नुकताच तो तुरुंगातून बाहेर आला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये हाजीपूरमध्ये हनी सिंगसह 7-8 बदमाशांनी मुथूट फायनान्स कंपनीच्या शाखेत घुसून कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवले होते. त्याने गार्डवर हल्ला केला आणि अवघ्या 20 मिनिटांत सुमारे 56 किलो सोने लुटून पळ काढला होता.