फुकट्या प्रवाशांकडून वसुलला तब्बल 1 कोटींचा दंड!, ‘या’ महिला TTE सर्वदूर चर्चा, रेल्वे मंत्रालयानही केलं कौतुक

फुकट्या प्रवाशांकडुन दंड वसुलणाऱ्या या एक महिला टीटीई आहेत. त्याचं नाव रोजलिन अरोकिया मेरी असून त्यांनी गेल्या एका वर्षात एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

ट्रेनमध्ये प्रवास करताना कित्येक वेळा विनातिकीट प्रवास  (without ticket) करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुलणारे टीटीई (TTE) तुम्ही पाहिले असणार. पण तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. टीटीईंच कामच फुकच्या प्रवाशांकडुन दंड आकारणे आहे. पण आता आम्ही तुम्हासा एका अशा टीटीईं बद्दल सांगणार आहोत ज्यांनी या फुकट्या प्रवाशांकडुन थोडे थोडके नव्हे तर तब्बल 1 कोटींचा दंड वसुलला आहे. कोण आहे हे टीटीईं जाणून घेऊया.

फुकट्या प्रवाशांकडुन दंड वसुलणाऱ्या या एक महिला टीटीई आहेत. त्याचं नाव रोजलिन अरोकिया मेरी असून त्यांनी गेल्या एका वर्षात एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. या कामगिरीमुळ एका वर्षात 1 कोटी रुपये दंड वसूल करणारी ती पहिली महिला टीटी बनली आहे. यापूर्वी, पुरुष टीटींनीही वर्षभरात एक कोटी रुपये जमा केले असतील, परंतु महिला टीटीने असे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी एकूण १.०३ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

रेल्वे मंत्रालयानं केलं कौतुक

रेल्वेचे कौतुक केले या कामगिरीबद्दल दक्षिण रेल्वेच्या जीएमने रोझलिन मेरीचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी केलेल्या कामाचे रेल्वे मंत्रालयानेही कौतुक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांची पोस्ट शेअर करून त्यांचे कौतुक केले. रेल्वे मंत्रालयाने या पोस्टमध्ये आपल्या कर्तव्याप्रती दृढ बांधिलकी दाखवत लिहिले आहे, दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक श्रीमती रोझलिन ओरेकिया मेरी या भारतीय रेल्वेच्या पहिल्या महिला तिकीट तपासणी कर्मचारी बनल्या आहेत ज्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तिकिटे वसूल केली जातात.