mallikarjun kharge

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे त्यांच्या वर्तणुकीवरून अनेकदा चर्चेत असतात. मात्र, आज त्यांना सभागृहात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी चांगलेच फटकारले.

    नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे त्यांच्या वर्तणुकीवरून अनेकदा चर्चेत असतात. मात्र, आज त्यांना सभागृहात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी चांगलेच फटकारले. धनखड यांनी खर्गेंना म्हटले की, ‘सभापती दबावाखाली काम करत असल्याचे तुम्ही इतक्या शब्दांत सूचित केले आहे. हे शब्द हटवले आहेत. तुम्ही सभागृहातील तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहात. प्रत्येकवेळी सभापती दबावाखाली काम करत असल्याचे सांगत आहात’.

    मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणातील मुद्दे काढून घेतल्याने विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी मोठा गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज काही तासांसाठी तहकूब करण्यात आले. तसेच अदानी मुद्द्यावरूनही विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज 13 मार्च सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

    याच दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होणार आहे. काँग्रेस सदस्या रजनी पाटील यांचे निलंबन मागे घ्यावे, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काही विरोधी सदस्यांच्या भाषणांचे काही भाग पटलावरून काढून टाकण्यावरून आणि अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत विरोधी सदस्यांनी केलेला गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

    सभापती दबावाखाली काम करत असल्याचे म्हटलं

    खर्गे यांनी सभापती दबावाखाली काम करत असल्याचे सभागृहात म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर सभापतींनी जोरदार आक्षेप घेत त्यांचं विधान सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आले.