साधूचा मृतदेह सलग २८ तास होता झाडावर, BJP आमदारासह तिघांवर गुन्हा

दुसरीकडे, संताला समाधी देताना जागेचा वाद उद्भवला. साधूच्या समर्थकांनी आमदाराच्या जमिनीवर समाधी देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे नाराज झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यात २० हून अधिक जण जखमी झाले. एक कॉन्स्टेबल यात जबर जखमी झाला आहे. त्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साधूला अजूनही समाधी देता आली नाही.

    नवी दिल्ली – राजस्थानात २० दिवसांत आणखी एका संताने आत्महत्या केली आहे. या संताने भाजप आमदारावर आश्रमाचा रस्ता रोखण्याचा आरोप करत आश्रमातीलच एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे प्रशासनाचे धाबे दणाणलेत. अधिकाऱ्यांनी साधूचा मृतदेह झाडावरून उतरवण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांच्या विरोधामुळे तसे करता आले नाही. आश्रमातील साधू व ग्रामस्थांनी संतांचे आत्महत्येचे पत्र सार्वजनिक करण्याची मागणी केली. जवळपास 28 तासांनंतर त्यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला.

    दुसरीकडे, संताला समाधी देताना जागेचा वाद उद्भवला. साधूच्या समर्थकांनी आमदाराच्या जमिनीवर समाधी देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे नाराज झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यात २० हून अधिक जण जखमी झाले. एक कॉन्स्टेबल यात जबर जखमी झाला आहे. त्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साधूला अजूनही समाधी देता आली नाही.

    प्रकरण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील राजपुरा गावचे आहे. येथील हनुमान आश्रमाचे साधू रवीनाथ महाराज (६०) गुरूवारी रात्री आश्रमात आत्महत्या केली. मृतदेह शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास खाली उतरवण्यात आला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास भीनमालचे भाजप आमदार पूराराम चौधरी यांच्यासह 3 जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.