
मुंबई- बिहार (Mumbai -Bihar) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) महिलांच्या हिंसेशी संबंधित असलेले दोन व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड होतायेत. बिहारमध्ये एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर, या महिलेनं चालत्या बसमधून उडी घेतल्याची बातमी व्हायरल होतेय.
मुंबई- बिहार (Mumbai -Bihar) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) महिलांच्या हिंसेशी संबंधित असलेले दोन व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड होतायेत. बिहारमध्ये एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर, या महिलेनं चालत्या बसमधून उडी घेतल्याची बातमी व्हायरल होतेय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ठाण्यातही असाच प्रकार घडलाय. त्याचीही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरुये. या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवाही पसरल्यात. नेमके काय आहेत हे दोन्ही प्रकार जाणून घेऊयात.
ठाण्याच्या प्रकरणाची का होतेय चर्चा ?
ठाण्याच्या कापूरबावडीतील ही घटना आहे, ज्याची चर्चा सध्या होतेय. या ठिकाणी असलेल्या क्रोमा स्टोअरमधील एका माजी कर्मचाऱ्याच्या विरोधात 23 वर्षांच्या तरुणीनं बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीचे नाव मनोज पोतदार असे असून गेल्या 21 दिवसांपासून हा संशयित आरोपी फरार आहे. या आरोपीच्या विरोधाता गेल्या 21 दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवलेली असून, या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेची माहिती पोलिसांनाही आहे. हा संशयित एयर इंडियात सेफ्टी ऑडिर असल्याचं आणि संशयिताचा लहान भाऊ ठाणे महापालिकेत नोकरीला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. नंतर त्यात तथ्य नसल्याचं समोर आलं. तक्रारदार तरुणीचे या तरुणाशी गेल्या 3 वर्षांपासून संबंध होते. मात्र त्याने लग्नाला नकार दिल्याने या तरुणीनं त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचं समोर आलं.
बिहारमध्ये बलात्कार टाळण्यासाठी बसमधून उडी
चालत्या बसमध्ये बलात्काराच्या भीतनं एका 35 वर्षीय महिलेनं चालत्या बसमधून उडी मारल्याच्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरुये. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हा प्रकार आहे. ही महिला नॅशनल हायवेवर बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडली. चालत्या बसमधून उडी मारल्यानं तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये. तिच्यावर उपचार सुरु असले तरी तिची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. बसमध्ये या महिलेची काही जणांनी छेड काढली. महिलेनं विरोध केल्यानंतर महिलेवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती. बसमध्ये ती एकटीच महिला प्रवासी होती. ही महिला दार्जिलिंगची रहिवासी असून सिलिगुडीला जात होती. त्यावेळी हा प्रकार घडला. आता पोलीस आरोपींचा शोध घेतायेत.
देशात महिलांवर अत्याचार
नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार बलात्काराच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. देशात दररोज 86 बलात्काराची प्रकरणं नोंदवण्यात येतायेत. यात अल्पवयीन मुला-मुलींचा सहभागही वाढतोय. गेल्या पाच वर्षांच्या वितार केल्यास अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या प्रकरणांत वाढ झालीये.