Samsung Galaxy S23 सीरिजच्या देशातील किमतीची घोषणा, प्री बुक केलात तर मिळणार बंपर डिस्काऊंट

सॅमसंगनं त्यांची फ्लॅगशीप सीरज असलेल्या Samsung Galaxy S23 मोबाईलला लाँच केलं आहे. या सीरिजच्या ब्रँडमध्ये 3 मोबाईल बाजारात आणण्यात आलेत.

  मुंबई : सॅमसंगनं त्यांची फ्लॅगशीप सीरज असलेल्या Samsung Galaxy S23 मोबाईलला लाँच केलं आहे. या सीरिजच्या ब्रँडमध्ये 3 मोबाईल बाजारात आणण्यात आलेत. त्यात Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+, Samsung Galaxy S23 Ultra यांचा समावेश करण्यात आलाय. जर या नव्या मोबाईलच्या व्हेरिएंटबाबत बोलायचं झालं तर, मेन लेन्ससाठी 200 एमपीचा क्वाड रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. तर फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

  या सीरजचे हे तिन्ही स्मार्ट फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर सोबत मिळणार आहेत. या तिन्ही फोनच्या भारतातील किमती किती असतील याची घोषणा सॅ२मसंगच्या वतीनं करण्यात आली आहे. हे तिन्ही फोन तुम्ही प्री-हुकही करु शकणार आहात. काय आहेत यांच्या किमती आणि इतर डिटेल्स हे जाणून घेऊयात.

  Samsung Galaxy S23 सीरिजची किंमत 

  सर्वात पहिल्यांदा या सीरिजमधील सर्वात पॉवरफुल असलेल्या Samsung Galaxy S23 Ultra बद्दल जाणून घेऊयात. भारतात हा स्मार्टफोन 3 कॉन्फिग्रेशनमध्ये येणार आहेत. त्यात 12 GB RAM, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट असणार आहे. याची किंमत 1 लाख 24, 999 इतकी असेल. याचाच 12GB RAM, 512 GB स्टोरेज असणारा व्हेरिएंट 1,34,999 रुपयांना उपलब्ध होईल. तर सर्वात टॉप व्हेरिएंटची किंमत 1 लाख 54,999 इतकी असेल. यात 12GB RAM, 1 TB स्टोरेज युझर्जना मिळेल.

  हा स्मार्टफोन फँटम ब्लॅक, क्रीम आणि ग्रीन रंगात उपलब्ध असणार आहे. यासह इतर चार रंग तुम्ही सॅमसंगच्या वेबसाईटवर पाहू शकाल. त्यात रेड, ग्रेफाईट, लाइम आणि स्काय ब्लू कलर्सचा समावेश आहे.

  Samsung Galaxy S23+ बाबत बोलायचं झालं तर, 8GB RAM, 128 GB असलेला मोबाईल 74,999 रुपयांना मिळेल. याचा टॉप व्हेरिएंट 79,999 रुपयांना मिळणार आहे. यातही चार रंग मिळतील.

  प्री बुकिंग ऑफर काय आहेत ?

  Samsung Galaxy S23 Ultra च्या प्री बुकिंगवर गॅलक्सी वॉच 4 एलटीई क्लासिक आणि गॅलक्सी बड्स 2 केवळ 4999 रुपयांना मिळतील. ज्यांना Samsung Galaxy S23 प्लस बुक करायचा आहे, त्यांना गॅलक्सी वॉच 4 बीटी व्हेरिएंट 4,999 रुपयांना मिळेल.

  तिन्ही मोबाईल्सवर 8000 रुपयांचं कॅशबॅक ऑनलाईन खरेदी केली तर मिळवू शकाल.