corona vaccine

तोंडावाटे देण्यात येणारी लस केवळ गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करू शकत नाही, तर mRNA लस आणि बूस्टर देखील संसर्ग टाळू शकते.

    कोरोनाच संकट (Corona) अजून टळलं नाही आहे. काही प्रमाणात त्याचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी कोरोनाचा संसर्ग होत आहेच. याच्यापासून बचावाकरिता लस घेणं फार महत्त्वाचं  आहे. नुकतीच नाकावाटे घेण्यात येणारी लस तयार  (Corona Vaccine) करण्यात आली असून 26 जानेवारीपासून ती रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. आता या संदर्भात एक अपडेट आहे. लवकरच लोकांना तोंडावाटे देण्यात येणारी लस उपलब्ध होऊ शकणार आहे. या संदर्भात शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. क्यूवायएनडीआर असं या लसीचं नाव आहे.

    या लसीने तिची फेज 1 क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे आणि या पुढील अनेक चाचण्या पुर्ण करण्यात येत आहे.  याचे निर्माते यूएस स्पेशॅलिटी फॉर्म्युलेशनचे संस्थापक, काइल फ्लॅनिगन म्हणाले की, क्यूवायएनडीआर लसीला किंडर ( qYNDR ) म्हणतात, कारण ही लस वितरित करण्याचा एक सोपा मार्ग आहे. या व्यतिरिक्त, न्यूझीलंडमधे करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचणीचे परिणाम सकारात्मक आले असून ही लस COVID-19 पासून बचावासाठी प्रभावी ठरेल अशी आशा आहे. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

    फ्लॅनिगन म्हणाले की, तुमच्या पचनमार्गाद्वारे लस टिकवणे खरोखरच आव्हानात्मक आहे. पोट आणि आतड्यांपर्यंत लस कशी पोहोचवायची आणि ती प्रभावी आणि योग्य प्रतिसाद कसा निर्माण करायचा हे आम्ही शोधून काढू शकलो. शास्त्रज्ञांना अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, तोंडावाटे देण्यात येणारी लस केवळ गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करू शकत नाही, तर mRNA लस आणि बूस्टर देखील संसर्ग टाळू शकते. पारंपारिक लसींच्या विपरीत, तोंडावाटे देण्यात येणारी लस आपल्या नाकातून किंवा आपल्या आतड्यांद्वारे (तोंडी तोंडावाटे QYNDR मध्ये) आपल्या शरीरात प्रवेश करतात.  विविध प्रकारच्या प्रतिकारशक्तीमुळे कोविड-19 संसर्गाचा सामना करण्यासाठी या लसीकडे प्रभावी लस म्हणून बघण्यात येत आहे.