राजधानी आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाने हादरली; ५.९ तीव्रता; जीवित हानी नसली तरी रहिवाशांची चिंता वाढली

भारतासह जगभरात लोक नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करत असतानाच मध्यरात्री दिल्लीत भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आता कामावरून घरी परतत असताना पुन्हा धक्के बसल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात भूकंपाने झाल्याने दिल्लीकरींच्या आनंदावर विरजण पडले होते. या घटनेला आठवडा होत नाही तोच पुन्हा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    नवी दिल्ली : भारतासह जगभरात लोक नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत (New Year Celebration) करत असतानाच मध्यरात्री दिल्लीत भूकंपाचे धक्के (Earthquake) बसले होते. त्यानंतर आता कामावरून घरी परतत असताना पुन्हा धक्के बसल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. रिश्टरस्केलवर याची तिव्रता ५.९ देण्यात आली आहे.

    नवीन वर्षाची सुरुवात भूकंपाने झाल्याने दिल्लीकरींच्या आनंदावर विरजण पडले होते. या घटनेला आठवडा होत नाही तोच पुन्हा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे (Tension) वातावरण आहे. ३१ च्या मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी दिल्लीसह (Delhi) हरयाणातील काही शहारांमध्ये जमिनीला हादरे बसल्याने नववर्षाचा जल्लोष करत असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (National Center For Seismology) याबाबतचे वृत्त दिले होते. घाबरलेल्या अनेक लोकांनी रात्र जागून काढली.

    दिल्लीसह हरयाणातील काही शहरांमध्ये मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तिव्रता ३.८ रिश्टर स्केल असल्याची माहिती सिस्मोलॉजी विभागाने दिली होती. संपूर्ण दिल्ली राजधानी क्षेत्रासह हरयाणातील रोहतक, महेंद्रगड, गुरुग्रामसह इतर परिसरातही धक्के बसले. उत्तराखंडच्या डेहराडूनपासून तर हरयाणाच्या महेंद्रगडपर्यंत जमिनीत फॉल्ट लाईन आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यात भेगा पडत असल्याने लाईनमध्ये कंपन निर्माण होत आहे. त्यामुळे उत्तराखंड, दिल्ली आणि हरयाणातील काही भागांमध्ये सातत्याने भूकंपाच्या घटना समोर आलेल्या आहेत. आज संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत.