सुरक्षा दलाच्या जवानांनी केला २ दहशतवाद्यांचा खात्मा, शोपियान भागात झालेल्या चकमकीत शस्त्रसाठाही हस्तगत

शोपियान भागात आज जवानांनी ‘लष्कर ए तोयबा’च्या (Lashkar e Toyba) दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Two Terrorists Killed) केला. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

    जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) शोपियान (Shopian) भागात आज सुरक्षा दलाच्या जवानांनी ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Two Terrorists Killed) केला. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

    आज पहाटे चकमकीस सुरूवात झाली. या चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेचे होते आणि त्यांची ओळख पटली असून, त्यातील एक बारीपोरा येथील सज्जाद अहमद होता आणि दुसरा पुलवामा येथील राजा बासित नजीर असल्याची माहिती समोर येत आहे.

    शोपियानच्या चौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी ग्रेनेड हल्ला, गोळीबार आणि नागरिकांच्या हत्येत सहभागी होता. दुसरा दहशतवादी हा नुकताच संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.