
भव्य दिव्य अशा सोहळ्यात आज संसदेच्या (Parliament Building) नवीन इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. यासोबत गेले अनेक दिवस चर्चेत आलेल्या सेंगोलची (Sengol) स्थापना करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारांत पंतप्रधान मोदींनी सेंगोल म्हणजेच राजदंड संसद भवनाला सुपूर्द केला. त्यापुर्वी राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.
या उद्घाटन सोहळ्यापुर्वी विधिवत पुजा करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. त्यांनतर पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले तसेच, पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चार करत सेंगोल मोंदीच्या हातात सोपवला. दरम्यान माेदींनी सेंगोलला नमन करत त्याची स्थापना केली. त्यापुर्वी त्यांनी राजदंडाला दंडवतही घातला.
#WATCH | PM Modi handed over the historic ‘Sengol’ by Adheenams before its installed in the new Parliament building pic.twitter.com/vGWhI9mg34
— ANI (@ANI) May 28, 2023
पंतप्रधान मोदींनी मजुरांचा केला सत्कार
संसदेत राजदंड बसवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कार केला.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नए संसद भवन के उद्घाटन के बाद भवन के निर्माण में काम करने वाले श्रमिकों को सम्मानित किया। pic.twitter.com/tN4rlOf6EV
— ANI_HindiNews (@AHindinews) May 28, 2023