
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा(Vinod Dua Passed Away) यांचे आज निधन झाले.
ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द वायर’चे संपादक विनोद दुआ(Vinod Dua Passed Away) यांचे आज निधन झाले. त्यांची मुलगी मल्लिका दुआ(Mallika Dua Post About Father’s Death) यांनी विनोद यांच्या निधनाविषयीची माहिती दिली आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मल्लिका दुआ यांनी दिली आहे. विनोद दुआ यांना या वर्षीच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Senior journalist Vinod Dua passes away, confirms his daughter and actress Mallika Dua. His cremation will take place tomorrow, she posts.
(Pic Source: Vinod Dua Twitter account) pic.twitter.com/CmkSgOrWfP
— ANI (@ANI) December 4, 2021
विनोद दुवा यांची मुलगी आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, ‘एक निडर आणि असाधारण पिता विनोद दुआ यांचं निधन झालं आहे. ते एक असाधारण जीवन जगले आहेत. दिल्लीतील निर्वासितांच्या कँपमधून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा ४२ वर्षे पत्रकारितेतील अनेक शिखरं पार करण्यापर्यंत झाला. या काळात ते नेहमी सत्य बोलत राहिले. ते आता आमची आई, त्यांची पत्नी चिन्ना यांच्यासोबत स्वर्गात जातील. त्या ठिकाणी ते गाणे गातील, जेवन बनवतील आणि नव्या प्रवासासाठी एकमेकांची सोबत देतील.”
View this post on Instagram
विनोद दुआ यांनी जवळपास ४२ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता केली आहे. विनोद दुआंनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचं विश्लेषणाला सुरुवात केली. त्यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये हा ट्रेंड सुरु झाला. विनोद दुआ यांनी दूरदर्शनासहित अनेक टीव्ही चॅनेल्सवर बातमीदारी केली होती.