व्हीडिओ! विमानातले गैरप्रकार थांबेनात, आता एयर होस्टेससोबत गैरवर्तनाचा VIDEO समोर, वाचा नेमकं काय घडलं?

एकीकडे विमानातील तांत्रित बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तर, दुसरीकडे प्रवाशांचे विमानात गैरवर्तन करणे थांबत नाही. स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटचे वेट-लीज्ड कॉरोंडेन फ्लाइट २३ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीहून हैदराबादकडे जाणार होते. त्यावेळी याच विमानातील केबिन क्रूशी प्रवाशांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली.

    नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून विमानात वेगवेगळ्या गंभीर घटना घडत आहेत. विमानात (Plane) एका महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असताना, आता स्पाईसजेटचे (SpiceJet) वेट-लीज्ड कॉरोंडेन फ्लाइट २३ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीहून हैदराबादकडे (from Delhi to Hyderabad) जाणाऱ्या विमानात दोन प्रवाशांनी होस्टेससोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळं विमानातील गैरप्रकार वाढत चालत असल्याची भावना व्यक्त होत आहे. (serious incident in spice jet from delhi to hyderabad action against two who misbehaved with air hostess)

    दरम्यान, एकीकडे विमानातील तांत्रित बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तर, दुसरीकडे प्रवाशांचे विमानात गैरवर्तन करणे थांबत नाही. स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटचे वेट-लीज्ड कॉरोंडेन फ्लाइट २३ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीहून हैदराबादकडे जाणार होते. त्यावेळी याच विमानातील केबिन क्रूशी प्रवाशांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेटने तत्काळ कारवाई करत या प्रवाशांना विमानातून उतरले. तसेच, त्या दोघांना सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आले. नुकताच स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली आहे.

    दिल्लीहून पाटण्यासाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानात रोहित कुमार, नितीन कुमार आणि पिंटू कुमार प्रवास करत होते. यावेळी त्यांनी मद्यधुंद अवस्थेत विमानातच गोंधळ घातला. सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, मद्यधुंद तरुणांनी या महिला कर्मचाऱ्यांनाच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना खाली उतरविण्यात आले. याआधीही विमानात अशा घटना घडल्या आहेत. एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या घटनेने संपुर्ण देशभरात खळबळ माजली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात मद्यधुंद तरुणांनी विमानातील महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले आहे.