बिहारमध्ये भीषण अपघात; अनियंत्रित स्कॉर्पिओ धडकली ट्रकला, 7 जणांचा मृत्यू,चार जण गंभीर जखमी!

हा अपघात झाल्यानंतर याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

    देशात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी दोन वाहनांमध्ये धडक होऊन तर कधी चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघाता होताना दिसतात. आता बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना (Bihar Accident News) घडली आहे. येथे उभ्या असलेल्या ट्रकवर एक स्कॉर्पिओ अनियंत्रित होऊन धडकली. यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी चार जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

    चालकाला लागली डुलकी

    बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे स्कार्पिओ वाहनाचा तोल बिघडल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यामुळे सात जणांना जीव गमवावा लागला. त्याचवेळी चार जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिवसागर येथील महामार्गावर हा अपघात झाला. अपघातातील जखमी झारखंडची राजधानी रांची येथून स्कॉर्पिओमधून आपल्या गावी परतत होते. सर्व मृत कैमूर येथील कुडारी गावचे रहिवासी होते. वाटेत स्कॉर्पिओ चालकाला डुलकी लागली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या स्कॉर्पिओमध्ये एकूण 12 जण बसले होते.

    स्थानिकांनी पोलिसांना दिली माहिती

    हा अपघात झाल्यानंतर याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली आहे. तर, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.