west bengal factory blast

पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात एगरा येथे हा एका फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट झाला आहे.

  कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) एका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे.(West Bengal Explosion) पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात एगरा येथे हा एका फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.

  ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक
  या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की या घटनेमुळे आम्हाला दु:ख होत आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2.5 लाख दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक जखमी व्यक्तीचा मोफत उपचार केला जाणार असून त्याला 1 लाख रुपये दिले जातील.

  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, एगरामध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा भाग उडिसाच्या सीमेजवळ आहेय आरोपीला आधी अटक करण्यात आलं होतं. त्याच्या विरोधात चार्जशीटदेखील दाखल करण्यात आलं होतं. त्याने पुन्हा अवैध कामं करायला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीवर भाजपचे लोक निवडून आले होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या फॅक्टरीचा मालक उडिसाला पळून गेला आहे. सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे स्फोट झाला तो बेकायदेशीररित्या उभा राहिलेला कारखाना होता.

  केंद्रीय यंत्रणांच्या तपासाला हरकत नाही -ममता बॅनर्जी
  एनआयए -एनआयए ओरडणाऱ्यांमुळे मला काही त्रास नाही. एनआयएकडून जर न्याय होणार असेल तर माझी हरकत नाही. पण या प्रकरणात राजकारण करू नये. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. ही वेळ राजकारण करण्याची नसून मदत करण्याची आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास केल्यास माझी काही हरकत नाही,असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.