shahrukh khan dunki

शाहरुख खानचा डंकी यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली आहे.

    बॉलिवूडच्या किंग खानने 2023 हे वर्ष आपल्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुख खानचा (Shah rukh khan) पठाण (Pathan) या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला होता त्याचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन उत्तम होतं. त्यानंतर शाहरुखच्या जवान चित्रपटालाही प्रेक्षकांची चांगली पंसती मिळत आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. शाहरुखने या वर्षातील तिसरा चित्रपट डंकीची घोषणा केली तेव्हा पासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबद्दल सध्या महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये प्रदर्शित न होता OTT प्लॅटफार्मवर रिलीज  होणार आहे.

    ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

    शाहरुख खानचा डंकी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार,
    ओटीटी अधिकार जिओ सिनेमाने विकत घेतले आहेत. वृत्तानुसार, ही डील 155 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. म्हणजेच या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 155 कोटींची कमाई केली आहे. डिजिटल आणि सॅटेलाइट दोन्ही हक्क 230 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
    मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी डंकी सिनेमाचं  दिग्दर्शन केलं आहे. डंकीची निर्मिती गौरी खान, ज्योती देशपांडे आणि राजकुमार हिरानी यांनी केली आहे. या चित्रपटात विकी कौशलही एका खास भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बोमन इराणी, सतीश शाह, दिया मिर्झा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.