शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची  दुसऱ्यांदा  भेट ; राजकीय तर्कवितर्कांना पुन्हा जोरदार उधाण

प्रशांत किशोर यांनी ११ जूनला शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती. देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या विरोधात सशक्त पर्याय असावा असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता आज दुसऱ्यांदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे.आज प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    मुंबईत झालेल्या भेटीनंतर दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा या दोघांमध्ये चर्चा होत असल्याने राजकीय तर्कवितर्कांना पुन्हा जोरदार उधाण आलं आहे.दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादी कांग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवार २२ जून आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, पीसी चाको उपस्थित राहणार आहेत.

    प्रशांत किशोर यांनी ११ जूनला शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती. देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या विरोधात सशक्त पर्याय असावा असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. प्रत्यक्ष राजकारणात प्रशांत किशोर नसले तरी मोदींविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचं काम किशोर करत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत दुसऱ्यांदा बैठक होत असल्यामुळे चर्चांना वेग आला आहे.