काँग्रेसचा प्रस्ताव नाकारत शरद पवार ३ दिवस बंगाल दौऱ्यावर ; ममता दीदींची घेणार भेट

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या कार्यक्रमावरून काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्याचे दिसत आहे.

    नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांमध्ये घमासान सुरु आहे. येथील मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. यातच आता बंगालच्या प्रचार दौऱ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उतरणार आहेत. काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारत शरद पवार तीन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार हे ममता बॅनर्जी यांची भेट घेत तृणमूल काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे.

    शरद पवार १ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांचा हा तीन दिवसीय दौरा असणार असून, ते यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. तसेच ममता ममता बॅनर्जी यांच्या काही रॅली, पत्रकार परिषदांना संबोधित करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

    काय होता काँग्रेसचा प्रस्ताव