उद्धव ठाकरेंचं ‘धनुष्यबाण’ गेलं, आता राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’?; निवडणूक आयोग करणार…

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोग मोठा निर्णय घेईल, असे सांगितले जात आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतात सध्या राष्ट्रीय पक्ष असा दर्जा असणारे 8 पक्ष आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसेच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो. पण हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी एखाद्या पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळणे गरजेचे असते.

निवडणूक आयोग करणार समीक्षा

याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मात्र, निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे.

सध्या राष्ट्रीय पक्ष किती?

भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), तृणमूल काँग्रेस (TMC), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) हे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत.