mumbai Actress accused of raping director

फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून 10 लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली(She raped her Facebook friend and sent the video to her father).

    लखनौ : फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून 10 लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली(She raped her Facebook friend and sent the video to her father).

    पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता याच्याशी फेसबुकवर 2019 मध्ये झाली. सनी गुप्ता हा या मैत्रीनंतर सतत तिच्याशी बोलायचा.

    दरम्यान, गुप्ता लखनौला येऊन तिला भेटला. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गुंगी आणणारे पदार्थ तिला खाऊ घालून बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने बनवला आणि तिला तो दाखवून ब्लॅकमेल करायचा. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.