शीतल म्हात्रे मॉर्फ व्हीडिओ प्रकरण; आमदार प्रकाश सुर्वेंचं मौन का? संजय राऊत यांचा सवाल, राऊत म्हणतात…

या प्रकरणात महिलांची बदनामी होत असेल तर पुरुषाचीही बदनामी होतेय. मग आमदार प्रकाश सुर्वे यांची नेमकी भूमिका काय आहे? या प्रकरणी ते मौन बाळगून का आहेत? ते कुठे आहेत? ते शांत का आहेत?  असा महत्त्वाची सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली– शिंदे गटाच्या नेत्या व प्रवक्त्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा मॉर्फ व्हीडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याचे काल पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहयला मिळाले. काल सभागृहात गदारोळ झाला होता, तर दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणी शिंदे गट आक्रमक झाला असून, या बदनामी करण्याचा प्रकार ठाकरे गटाकडून केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

आमदार प्रकाश सुर्वेंचं मौन का?

दरम्यान, आज नवी दिल्लीत खासदार राऊत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याचा आधी तपासले पाहिजे. त्यानंतर त्यात मॉर्फिंग झालंय की आणखी काही, हे बघा. नंतरच लोकांना ताब्यात घ्या, अटक करा, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच या प्रकरणात महिलांची बदनामी होत असेल तर पुरुषाचीही बदनामी होतेय. मग आमदार प्रकाश सुर्वे यांची नेमकी भूमिका काय आहे? या प्रकरणी ते मौन बाळगून का आहेत? ते कुठे आहेत? ते शांत का आहेत?  असा महत्त्वाची सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बापानंतर आता मुले देखील पळवताहेत…

सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे शिंदे गटात सामील झाले, यावर राऊत यांना प्रश्न विचारला असता, भूषण देसाई यांचे सामाजिक व राजकीय कार्य काय आहे, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. तसेच आजपर्यंत मिंधे गट बाप पळवत होत, पण आता मुलंही पळवायला लागलेत. असा घणाघात राऊतांनी शिंदे गटावर केला.

दोषींना अटक करा- चौधरी

भाजपा महिला आमदार मनिषा चौधरी यांनी व्हीडिओ मॉर्फ प्रकरणी आक्रमक होत, सरकारने याची कसून तपासणी करुन, या प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच आरोपीना अटक व्हावी अशी मागणी केली. यावेळी चौधरी बोलत असताना मध्येच अबू आझमी यांनी हस्तक्षेप केल्यामुळं चौधरी ह्य आझमी यांच्यावर भडकत यात तुमचा सहभाग आहे का? असा संतप्त सवाल चौधरींना केला.