काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहून शेहला रशीद यांनी मोदी सरकारंच केलं कौतुक, म्हणाल्या, ‘हा तर नवा काश्मीर’

     मंगळवारी सगळीकडे देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील लोकांनीही काल स्वातंत्र्यदिन साजरा केला. काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दुसरीकडे खुद्द काश्मिरींनाही नवे काश्मीर पाहून आश्चर्य वाटत आहे. आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी म्हण्टले की, यापूर्वी त्यांनी केवळ ईदच्या दिवशीच असा उत्साह पाहिला होता. त्याचबरोबर कार्यकर्त्या शेहला रशीदनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Shehla Rashid On Jammu and Kashmir) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.

    जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

    जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणा लोकांनी राष्ट्रध्वजारोहण केलं. यावेळी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांचा सहभाग दिसला तर लहान मुलेही मोठ्या संख्येने उपस्थित होती. स्वत: काश्मिरीं लोकांनाही नवे काश्मीर पाहून आश्चर्य वाटत आहे. लोकांचा हा उत्साह पाहून आयएएस अधिकारी शाह फैसल म्हणाले की, यापूर्वी त्यांनी केवळ ईदच्या दिवशीच असा उत्साह पाहिला होता.

    शेहला रशीद यांनी नरेंद्र मोदींच केलं कौतुक 

    शेहला रशीद यांनी म्हण्टलं की, “हे स्वीकारणे कठीण असू शकते परंतु नरेंद्र मोदी सरकार आणि जम्मू-काश्मीरच्या एलजी-प्रशासनाच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील मानवी हक्कांचे रेकॉर्ड सुधारले आहे. सरकारच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे जीव वाचवण्यात मदत झाली आहे. हा माझा दृष्टिकोन आहे.” यासोबतच शेहला रशीदनेही पीएम मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे.

    दहशतवाद्याच्या भावाने फडकवला तिरंगा, व्हिडिओ व्हायरल

    जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टूचा स्वातंत्र्य दिनापूर्वी तिरंगा फडकावण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने मनापासून तिरंगा फडकवल्याचे सांगितले. त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचं तो म्हणाला, या व्हिडिओवर सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.
    @bahl65 या ट्विटर युझर लिहिले, “अरे देवा, कोणी खाते हॅक केले आहे का?” दुसर्‍याने लिहिले, “त्याच्या विचारांमध्ये काय बदल झाला?” ही जाणीव अचानक झाली आहे की हळूहळू?’ @suryabhansv यांनी लिहिले, ‘जेव्हा तुम्ही विचारसरणीचा प्रिझम काढून स्वतःला एक सामान्य माणूस म्हणून पाहता तेव्हा तुम्ही खरे बोलता.’