आई-वडिलांपेक्षाही शिवरायांवर आमची निष्ठा, त्यांचे जीवन आमचे आदर्श, गडकरींचे सूचक ट्विट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यात टीकेचा भडीमार केला जात असून त्यांच्याविरोधात निषेध, आंदोलनही केले जात आहेत. यावरुन भाजपला विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले, असे असतानाच आता भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी सुचक ट्विट केले आहे.

  मुंबई – शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आमच्या आई- वडीलांपेक्षा देखील शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विट करून व्यक्त केले. त्यांनी शिवरायांवरील एका कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विट केला आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यात टीकेचा भडीमार केला जात असून त्यांच्याविरोधात निषेध, आंदोलनही केले जात आहेत. यावरुन भाजपला विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले, असे असतानाच आता भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी सुचक ट्विट केले आहे.

  गडकरी ट्विटमध्ये म्हणतात, ”शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आमच्या आई- वडीलांपेक्षा देखील शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमचे आदर्श आहे. यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जणासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी.”

  ”डी. एड., बी. एड. करणारा राजा नव्हता. वेळ पडली तरीही आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारे शिवाजी महाराज एक महान राजे होते.”

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श आहेत. आताचे आदर्श डाॅ. आंबेडकर, नितीन गडकरी, शरद पवार आहेत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यात रोष निर्माण झाला. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती असे बेताल वक्तव्य केले. यावरुन पुन्हा टीकेचे वार कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर झाले.