Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. (Sanjay Raut tour to Aayodhay) संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज अयोध्येत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य केले. राष्ट्रीय हितासाठी शिवसेनेकडून चर्चेची दारं कधीच बंद केलेली नाहीत. असं वक्तव्य राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन राऊतांनी केलं आहे.

    अयोध्या : निवडणूक आयोगाने (Election commission) देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा (presidential election) कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरू शकतील. (Candidate Application) 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची (Candidate Application) छाननी होणार आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी (21 July result) होणार आहे. त्यामुळं विरोधपक्षासह भाजपाने (BJP) सुद्धा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काल विरोधीपक्षांनी बैठक घेतल्यानंतर आता भाजपाच्या सुद्धा हालचानीना वेग आला आहे. यावर आता संजय राऊतांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. (Sanjay Raut tour to Aayodhay) संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज अयोध्येत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य केले. राष्ट्रीय हितासाठी शिवसेनेकडून चर्चेची दारं कधीच बंद केलेली नाहीत. जेव्हा राष्ट्रीय विचार असतात, राष्ट्रीय मुद्दे असतात, नेतृत्वाचा प्रश्न असतो, तेव्हा शिवसेना (Shivsena) एक राष्ट्रीय बाणाचा पक्ष आहे. आम्ही राष्ट्र हितासाठी अग्रेसर असतो.

    तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दरवाजा बंद करून कधी बसलेले नाहीत. राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी सतत दरवाजे उघडे ठवलेले आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत नाहीत. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व मिळावी एवढीच आमची इच्छा असते, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. दरम्यान, ममता बॅनर्जींनी घेतलेल्या विरोधकांच्या बैठकीत शिवसेनेकडून सुभाष देसाई हे उपस्थित होते.