धक्कादायक! ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून केली हत्या

शहरातील हजीरा पोलीस ठाणे परिसरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी २ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी तिचा भाऊ आणि मुलांसोबत घराबाहेर खेळत होती. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

    नवी दिल्ली – ग्वाल्हेरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करून झुडपात फेकण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता होती. तिचे वय सुमारे 9 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोस्टमाॉर्टेमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

    शहरातील हजीरा पोलीस ठाणे परिसरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी २ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी तिचा भाऊ आणि मुलांसोबत घराबाहेर खेळत होती. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात एक नातेवाईक मुलीला रेल्वे ओव्हर ब्रिजखाली घेऊन जाताना दिसत आहे. हा नातेवाईक घरी येत असे, असे घरच्यांनी सांगितले.