धक्कादायक ! स्वतःच्याच लहान बहिणीला आधी लोटले व्यसनाधिनतेच्या खाईत आणि त्यांनतर १५ व्या वर्षी देहविक्री व्यापारात ; तरुणीला अटक

भोपाळ : भोपाळ पोलिसांनी एका २० वर्षांच्या मुलीला अटक केली आहे. तिने स्वतःच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन बहिणीला २ वर्षांपूर्वी ड्रग्स आणि मद्यपान करण्यास शिकवले. त्यानंतर, देहविक्री धंद्यात ढकलले. याचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मोठ्या बहिणीला लक्झरी आयुष्य जगण्याची इच्छा असल्याने तिने स्वतःच्या बहिणीला या कामात ढकलल्याचे सांगितले. लहान बहिणीवर २ वर्षात ६ जणांनी बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे

भोपाळ : भोपाळ पोलिसांनी एका २० वर्षांच्या मुलीला अटक केली आहे. तिने स्वतःच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन बहिणीला २ वर्षांपूर्वी ड्रग्स आणि मद्यपान करण्यास शिकवले. त्यानंतर, देहविक्री धंद्यात ढकलले. याचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मोठ्या बहिणीला लक्झरी आयुष्य जगण्याची इच्छा असल्याने तिने स्वतःच्या बहिणीला या कामात ढकलल्याचे सांगितले. लहान बहिणीवर २ वर्षात ६ जणांनी बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे.

चाइल्डलाइनच्या माध्यमातून समुपदेशन केल्यावर ही भयानक घटना उघडकीस आली आहे. सर्व आरोपींविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये एका चुलतभावाचा चुलत भाऊही असल्याचे समोर आले आहे.
गुन्ह्याचे तपास अधिकारी अर्शिया सिद्दीकी यांनी सांगितले की, पीडित मुलगी दहावीत शिकते. तर तिचे वडील मुंबईत व्यवसाय करतात आणि आई अर्धवेळ व्यवसाय करते. तिची मोठी बहीण इंदूर येथील एका फर्ममध्ये काम करत होती.मोठी बहीण सध्या अटकेत आहे.

सिगारेट आणि ड्रग्स घेण्यास शिकविले

गाणे ऐकण्याच्या बहाण्याने तिची मोठी बहीण गच्चीवर घेऊन गेली असे पीडितेने सांगितले. तिथे तिने पर्समधून सिगारेट काढून धूम्रपान करण्यास शिकवले. त्यानंतर ती रोज पीडितेला टेरेसवर घेऊन जायची. तिथे तिने गांजा आणि मद्यपान सुरू केले. अर्शिया सिद्दीकी म्हणाली की ती अल्पवयीन मुलगी सुद्धा पूर्ण व्यसनाधीन झालेली.

ब्रँडेड वस्तूंच्या मोहापायी ढकलले देहविक्री व्यापारात

मोठ्या बहिणीने पीडितेला व्यसनाच्या नादी लावले त्यांनतर ड्रग्ज घेण्यासाठी पैसे लागतील असे लहान बहिणीला सांगितले. आणि पैसांसाठी तिला कोणाबरोबर तरी जाऊन झोपावे लागेल ज्यामुळे तिला पैसे मिळतील जेणेकरुन ड्रग्ज आणि ब्रँडेड कपडे घेऊ शकतो. त्यानंतर, बहीण पीडितेसह विमानतळाजवळील एका घरात घेऊन गेली. जेथे पीडितेवर बलात्कार करण्यात आला आणि त्या बदल्यात २००० रुपये दिले. याप्रकरणी आरोपी समीर उर्फ ​​सुनीलला अटक करण्यात आली आहे.

जेव्हा पीडित मुलगी घरातून बेपत्ता होती. जेव्हा तिच्या आईने तरुणीला गायब होण्याबद्दल प्रश्न केला तेव्हा ती आक्रमक झाली. त्याचवेळी आईशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली. त्यांनतर आईने पोलिसात लहान मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. काही दिवसांनी मुलगी परत आली आणि तिने आपल्या मित्रांसह बाहेर असल्याचे पोलिसांना सांगितले. मग नोव्हेंबरमध्ये आईने मुलीला चाइल्डलाइनला समुपदेशनासाठी नेले. चाईल्डलाईनने तिला एका निवारा गृहात पाठविले, जिथे तिला एका महिन्यासाठी समुपदेशन करण्यात आले. समुपदेशन दरम्यान मुलीने सर्व घटनाक्रम उघड केला आहे.

शनिवारी चाईल्डलाईनने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर सात जणांवर बलात्कार, अपहरण आणि मानवी तस्करीखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पीडितेची मोठी बहीण आणि चुलतभावाचासुद्धा समावेश आहे. तपास अधिकारी अर्शिया सिद्दीकी म्हणाल्या की पीडितेवर बरीच लोकांनी बलात्कार केला पण त्यांची नावे तिला आठवत नसल्याचे सांगितले.