सिद्धारमैया सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार; 24 मंत्री घेणार शपथ, शिवकुमार यांच्यावर कोणती जबाबदारी?

काल उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली आहे. यानंतर आज सिद्दरामय्या सरकारमधील मंत्री शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटीलही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय.

    बंगळुरु : कर्नाटकात नुकतीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. बहुमताचा आकडा काँग्रेसनं पार केल्यामुळं भाजपाचे सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे फसले आहेत. दरम्यान, निकालाच्या पाच दिवसांनंतर मुख्यमंत्री कोण यावर निर्णय झाल्यानंतर आता कर्नाटकात मंत्रिमंडळ स्थापन केले जाणार आहे. काल उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली आहे. यानंतर आज सिद्दरामय्या सरकारमधील मंत्री शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटीलही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय. तसेच इश्वर खंडारे घेणार देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, सीमाभागातून संधी खंडारे यांना संधी दिली आहे.

    सिद्धारमैया सरकारचा आज विस्तार. 24 मंत्री घेणार शपथ

    दरम्यान, 20 मे रोजी, सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांच्यासह 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज (27 मे) रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार व पक्ष नेतृत्वाच्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यावर सोनिया व राहुल गांधी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. याबाबत काल मुख्यमंत्री सिद्दरामय्या व उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी दिल्लीत सोनिया व राहुल गांधी यांची भेट घेतली.

    शपथविधी सोहळ्याला कोणाची उपस्थिती

    आज कर्नाटकात काँग्रेसच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी तसेच राहुल गांधी हजर राहणार आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याऐवजी पक्षाच्या खासदार काकोली घोष यांना शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी पाठवले होते. सिद्धरामय्या यांच्या शपथविधीला 9 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यात मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), नितीश कुमार (जेडीयू), तेजस्वी यादव (एआरजेडी), डी राजा व सीताराम येचुरी (डावे पक्ष), एमके स्टॅलिन (डीएमके), शरद पवार (राष्ट्रवादी), फारूख अब्दुल्ला (राष्ट्रीय काँग्रेस) व कमल हसन (मक्कल नीधी मैयम) यांचा समावेश आहे.