चीनसोबत युद्ध झाल्यास भारत विजयी होणार; १८ महिन्यांत भारताच्या लष्करी ताकदीत लक्षणीय वाढ, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची ग्वाही

लष्करप्रमुख म्हणाले की, उत्तरेकडील आघाडीचा प्रश्न आहे, तेथे गेल्या १८ महिन्यांत आमचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते म्हणाले, 'युद्ध हा शेवटचा उपाय आहे, पण जर युद्ध झाले तर आपण विजयी होऊन परत येऊ.'

    नवी दिल्ली : गेल्या १८ महिन्यांत भारताच्या लष्करी ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी लष्करप्रमुख म्हणाले की, लडाखमधील सीमेजवळ भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. चीनसोबत युद्ध झाल्यास भारत विजयी होऊन परतेल, देशाचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी अशी ग्वाही दिली.

    वार्षिक लष्कर दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लष्करप्रमुखांनी युद्ध हाच शेवटचा पर्याय असून सीमावाद सोडवण्यासाठी चीनशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. लष्करप्रमुख म्हणाले की, उत्तरेकडील आघाडीचा प्रश्न आहे, तेथे गेल्या १८ महिन्यांत आमचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते म्हणाले, ‘युद्ध हा शेवटचा उपाय आहे, पण जर युद्ध झाले तर आपण विजयी होऊन परत येऊ.’

    लष्करप्रमुख म्हणाले, “आम्ही फक्त एका बाजूवर लक्ष केंद्रित करत नाही, तर संपूर्ण उत्तर आघाडीवर आम्ही सर्वांगीण दृष्टिकोन ठेवत आहोत. हे केवळ सशस्त्र दलांची संख्या वाढवण्याबद्दल नाही तर शस्त्रास्त्रांची संख्या वाढवण्याबद्दल देखील आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाचाही मुद्दा आहे.